शुक्रवार, १५ जानेवारी, २०२१

नामदेव ढसाळ ह्यांच्यावर कविता

 #प्रिय_ढसाळ

तू लेखणी उचललीसचं अशी की म्यानात

बंद असलेल्या तलवारी पून्हा बाहेर निघाल्या,

तू लिहिलंस चारित्र्याच्या वासाचा सुगंध हा फुलांच्या

सुगंधापेक्ष्या कैक पटीने सुगंधी असतो म्हणून.

तू लेखणीने दिलेस जबरी हादरे

पुराण कथा, धर्मशास्त्र, साहित्यशास्त्र, इत्यादींना

कारण तू शब्दांचा महासागर होतास !!

तू व्यवस्थेला दिलेल्या शिव्या

मला ओवी समान वाटल्या !!

तू मराठी साहित्यात एक नवा

परिवर्तनवादी विद्रोह आणलास,

तुझ्या कवितेतून कोणताच सेटलमेंट दिसला नाही.

कारण तुझी कविता हि कधीच काल्पनिक नव्हती,

ती सांगत होती सत्य ! इथल्या अंधारल्या झोपडीचे,

वस्त्यांचे, रस्त्यांचे आणि शोषितांचे.

तू पँथर बनून चळवळ समजावलीस,

रक्ताचे पाट पाहणारे हे डोळे,

सल्ली बोटी नल्ली बोटी गिळणारे हे गळे,

जन्माला आलो म्ह्णून जगणारे हे शरीर,

आता शब्दांचा,विचारांचा, साहित्याचा, सांस्कृतिक

परिवर्तनाचा मोठा हिमालय उभारत आहेत.

कारण तू लेखणीच्या गोफणगोंडयातुन

मारलेला शिव्यांचा शब्द रुपी दगड

थेट आमच्या काळजावर लागलायं !!

बघ ना तू कवितेतून मुंबईला रांड म्हणालास आणि

ही मुंबईनगरी तुझ्या कवितेच्या प्रेमात पडली.

नुसतं कवितूनचं नाही तर खऱ्या आयुष्यात ही

विद्रोह जगणाऱ्या पँथरा ! तू माझ्या मनात,

माझ्या लेखणीत जीवंत आहेस.

रोहित जगताप

8983451500

पद्मश्री नामदेव ढसाळ

ह्यांना विनम्र अभिवादन 💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा