गत वर्षात अनेक दुःख होती.
ती नवीन वर्षी येणार नाहीत असं नाही
खरं तर आपलं जीवनच एक संघर्ष बनलं आहे
त्यामुळे नवं वर्षातही आपल्याला
अनेक गोष्टींशी संघर्ष करायचा आहे.
त्यासाठी आपण तयार राहुयात✊
दुःख मुक्तीचा संदेश आपल्याला बुद्धांनी दिलाय
अनित्यवादाचा सिद्धांत सांगितलाय
तो आपण आचरणात आणूयात.
ह्यावर्षी संकल्प करूयात की,
जातिवाद, लिंगभेद,अंधश्रद्धा ह्यांना
आपल्या आयुष्यात आपण थारा देणार नाही
मैत्री, नाती, शिक्षण, आरोग्य, समाजसेवा
मानवाचे हित जोपासणाऱ्या साऱ्या गोष्टी
आपण आपले कर्तव्य म्ह्णून पूर्ण करूयात.
भारतीय संविधानातील मूल्य आणि कर्तव्ये
आपण लक्षात घेऊन त्यावर काम करूयात.
संविधान घराघरात पोहोचवूयात.
माणूस बनू या !! माणूस वाचवू या !!
प्रेम करूयात !! प्रेम देऊयात !!
२०२० वर्षात झालेल्या चूका २०२१ ह्या नवं वर्षात होणार नाहीत ह्याची काळजी घेऊयात.
अंधारातून प्रकाशात येऊयात. अत्त दीप होऊयात.
नवं वर्षाचे स्वागत दोस्ती जिंदाबाद म्हणून करूयात.
संघर्ष करत राहू !! मुक्ती गाणे गात राहू !!
दोस्ती जिंदाबाद ✊
येणाऱ्या नवं वर्षाच्या शुभेच्छा 💐
रोहित जगताप
8983451500
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा