शनिवार, १६ नोव्हेंबर, २०१९

महापुरुषांना वंदन

कसला धर्म कसली जात मिळत नव्हती नौकरी
मोघलांच्या ह्या जुल्मापाई बसली होती साखळी,
मगं आलं शिवबाचं वादळ गं बया..
त्यांन स्वराज्य ते निर्मिल बया..

शिवबानंतर संभा आला त्यांन रोखली तोफ ती.
ब्राम्हण त्या कपट्यांनची मोडुन काढली हेरगीरी..
असा छावा तो गं शिवरायांचा बया..
त्यांन डरकाळी ती फोडली बया..

ज्योतिच्या गं न्यान दिव्यानं पेठून उठली सावित्री
स्त्री शिक्षणाची गं ती चढू लागली पायरी..
आज तिच्या शिक्षणामुळं बया..
आज तिच्या त्यागा मुळं ग बया..
पोरी डाँक्टर वकिल झाल्या गं बया..

कोण्या एका जाती मध्ये कबीर हा जन्मला,
दोहे गावून जनतेत क्रांती करू लागला.
मग त्याच्या दोह्यामुळं गं बया..
त्यांन जातपात फोडली गं बया...

विरांच्या ह्या भुमीतून शाहु राजा उठला,
आरक्षण देऊन त्यांन भिमबा घडवलां..
मग त्या शाहुराजा मुळं गं बया..
शिकलं आंबेडकर लंडन ला बया..

अस्प्रुशांच्या रक्तातून भिमबाबा जन्मला..
ब्राम्हवाद, जातीवाद संपवाय सुटला...
असं लिहूनं ते संविधान बया..
ह्यो भारत देश घडवला बया..
ह्यो भारत देश घडवला बया..

रोहित जगताप.
२९ आँगस्ट २०१८