गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२०

प्रेम कविता

प्रेम कविता

इंद्रधनूचे रंग खेचून त्याची ओढनी तुला द्यावी
कोकिळेने तुझ्यासाठी रचलेली गाणी गावी,
शब्दांनी ओवलेल्या कवितांचा हार बनवूनी
तुझ्या केसांमध्ये माळावा मी गजरा
चंद्र सूर्य चांदण्यांनी तुला करावा राणी मुजरा,
तुझ्या काटेरी वाटेवर मी समतेची रांगोळी काढावी
जात धर्म भेदानं रचलेला इमली कोसाळावी,
एका बोधिवृक्षाखाली हे नातं असं खुलावं
मी वृक्षाच्या पाना-पानांवरी तुझं नावं कोरावं.
रोहित जगताप
8983451500





 
x