#राजगृह
धर्म ग्रंथांनी नाकारली होती आमची बस्ती
बा भिमानं !! राजगृह बांधून
दाखवली आमची हस्ती.
पण दगडांच्या देशात
दगडांनीचं वार केला
विचार संपवण्यासाठी
पुन्हा नीच प्रकार केला
तो दगड लागला साऊला
तो दगड लागला जोतीबाला
तो दगड लागला बा भिमाला
तो दगड लागला इतिहासाला
माणसं तोडनं, घर फोडनं
इतिहास गाडनं, लपून वार करनं
कपट नीती ही सैतानी..
दंगखोर..!!
हल्लेखोर..!!
संस्कृती चोर..!!
भुर्टे खोर..!!
माणसं ओळखून आहोत सारी बेईमानी.
वेशी सोडून कधीच बाहेर पडलो आम्ही
त्यांच्या पेशीतून द्वेष नावाची घाण निघालीच नाही
पण लक्षात घ्या !!
बोधिवृक्षाखाली बसलेला बुद्ध,
आम्हाला अहिंसक बनवतोय
श्वासांवर नियंत्रण..
क्रोधावर नियंत्रण..
द्वेषावर नियंत्रण..
बुद्धांच्या गुरुत्वाकर्षणाकडे
आम्ही जोडले गेलोय.
राजगृह ही बोधिवृक्षाखालची सावली
तमाम आंबेडकरी जनतेची माऊली
आज माऊलीला धक्का लागलाय
आज आमच्या अस्मितेला धक्का लागलाय
पण इतिहासाकडून तुम्ही
काहीच कसं शिकत नाही
ज्ञानाची तटबंदी
दगड धोंड्यांच्या हल्ल्याने
कधीच ढासळत नाही.
रोहित जगताप
सूर क्रांतीचे जलसा
8983451500
#RajgruhaStandsTall
#Rajgruha
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा